31 वर्षीय खलाशाच्या उपचारादरम्यान मृत्यू

देवगड (प्रतिनीधी)

देवगड बंदर येथील एका नौकेवर कामास असलेल्या खलाशी सुक्रा ओराम (वय ३१,कुंत्रा बहाल सलमपुर ओरिसा)याचा आज पहाटे ४:३० उपचारादरम्यान देवगड ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवगड बंदर येथील नौकेवर कामास असलेले ३१ वर्षीय खलाशी सुक्रा ओराम यांच्या छातीत वेदना होऊन अचानक दुखू लागल्यामुळे उपचाराकरिता त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी यांना यांनी त्यांना तपासून ते मयत असल्याचे घोषित केले. याबाबतची खबर तांडेल मुताप्पा बसप्पा बिशरहड्डी (२९ याला यलगुर्गा ,कर्नाटक) यांनी देवगड पोलिसात दिली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करत आहेत.