नेमळेचे ग्रामदैवत सातेरी देवस्थानचा उद्या जत्रौत्सव

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

नेमळे गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार १६ नोव्हेंबर रोजी होणार असून तीन गावच्या मर्यादेपैकी श्री देवी सातेरी हे प्रसिद्ध जागृत नवसाला पावणारे देवस्थान तसेच खासकरुन माहेरवासीणींची ओटी भरण्याची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे.

हजारो भाविक ओट्यांचा नवस फेडण्यासाठी श्री देवी सातेरी मंदिरामध्ये गर्दी करतात.

यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम दुपारपासून ओट्या भरण्याचा कार्यक्रम तसेच रात्रौ आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.याचा सर्व भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन नेमळेतील गांवकर मानकरी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Sindhudurg