अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य असलेल्या भारतीयांना घेऊन विमान उतरले

अमेरिकेतील 205 भारतीयांना घेऊन एक अमेरिकन विमान आज दुपारी अमृतसरमध्ये उतरले. हे सर्व नागरिक अमेरिकेत अवैधपणे वास्तव्यास होते आणि त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने परत पाठवले आहे. हे विमान श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. हे नागरिक पंजाब आणि आसपासच्या राज्यांतील आहेत.

ट्रम्प यांनी निवडणुकीत अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली आहे. भारत सरकारनेही या नागरिकांना परत घेण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यांची राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्याची अट घातली आहे. पंजाबचे एनआरआय व्यवहार मंत्री कुलदीप सिंह धलीवाल यांनी अमेरिकन सरकारच्या या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या लोकांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांना तेथे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळायला हवे होते.