वसंत केसरकर यांचा जीवनप्रवास नव्या पिढीला प्रेरणादायी : रमाकांत खलप

जेष्ठ पत्रकार वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन

सावंतवाडी । प्रतिनिधी : वसंत केसरकर यांनी सामाजिक जडणघडणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोवा मुक्ती संग्राम तसेच बेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी त्यांचे मोठे कार्य आहे. सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्याकाठ्याही खाल्ल्या आहेत. मात्र, हे काम करीत असताना कधीही फायद्या तोट्याचा विचार न करता ते दीपस्तंभासारखे कार्यरत राहिले. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यामुळेच हा देश अखंडित असून त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी काढले.

राजकारणतला प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ उतारांची यशोगाथा सांगणार्‍या सावंतवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोंसले, राणी शुभदा देवी भोंसले, माजी आमदार शंकर कांबळी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, ॲड. अजित भणगे, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, लोकमान्य सोसायटीचे पंढरीनाथ परब, प्रा. जी.ए बुवा, ॲड. नकुल पार्सेकर, संजय पडते, भाई गोवेकर यांच्यासह अन्य पत्रकार व सदस्य उपस्थित होते.

अलिकडे राजकारणात गेल्यानंतर कार्यकर्ते काही दिवसात श्रीमंत होतात. मात्र अनेक वर्षे राजकारण आणि समाजकारणात काम करणार्‍या अण्णा केसरकर यांचे पाय आजही जमिनीवर आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यांनी शब्दबध्द केलेल्या पुस्तकामुळे अनेक आंदोलन व सत्याग्रहांना आवाज फुटला आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, असेही रमाकांत खलप यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, अण्णांनी अनेक कार्यकर्ते घडविण्याचे काम केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकवरुन सुरू असलेल्या वादात त्यांची भूमिका महत्वाची होती. त्यांच्या सोबत आंदोलन करण्याचे भाग्य आम्हा मिळाले आहे. ॲङ. अजित भणगे यांनीही अण्णांचे कार्य व त्यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राजे खेमसावंत भोसले, प्रा. जी. ए. बुवा व अन्य मान्यवरांनीही आपले विचार मांडले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, पत्रकार दीपक गावकर, मोहन जाधव, उमेश सावंत.विजय देसाई, शिवप्रसाद देसाई, जतिन भिसे, राजू तावडे, विजय देसाई, अनंत जाधव, मंगेश तळवणेकर , संदिप गावडे,अपर्णा कोठावळे, डी. टी. देसाई, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजी पं. स. सदस्य रुपेश राऊळ यांसह अण्णा केसरकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.

 

Sindhudurg