हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीवासियांनी सुद्धा दाखवला भाजपावर विश्वास : ना. नितेश राणे

रत्नागिरी । प्रतिनिधी  

हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीवासियांनी सुद्धा दाखवला भाजपावर विश्वास दाखवून २७ वर्षानंतर दिल्लीत पुन्हा सत्ता स्थापन होत आहे. त्यामुळे सतत खोट बोलणाऱ्या अरविंद केजरीवाल हे आता त्यांच्या शिशमहलमध्ये बसून दिल्लीतील भाजपाची सत्ता स्थापन होताना पाहणार आहेत अशी प्रतिक्रिया मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली आहे.

 

मत्स्य व्यवसाय विभागाच्या बैठकीसाठी ना. नितेश राणे हे रत्नागिरीमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आजचा विजय बघता आपला देश बदलतो आहे, घडतो आहे, हे दिसते. हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्लीत सुद्धा दिल्लीच्या जनतेने 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचा सरकार बसवला आहे. आमच्या पक्षावर विश्वास दाखवलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी जी मेहनत दाखवली त्यामुळेच हा विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचा खरा चेहरा दिसला आणि विजयाचा फुगा फुटला. खोटं बोलून बोलून आपण किती काळ फसवू शकतो, जनतेला सगळं माहिती असतं आणि जनता योग्य पद्धतीने निर्णय करत असते. त्याचं प्रतिबिंब दिल्लीत पाहायला मिळालं. केजरीवाल आत्मविश्वासाने बोलायचे मोदिजीना या जन्मी केजरीवालला हरवता येणार नाही. मात्र आत तेच केजरीवाल कायमस्वरूपी आपल्या शीशमलमध्ये मोदींच्या नेतृत्व सरकार कसं बनतं ते बघणार आहेत असा टोलाही ना. राणे यांनी लगावला.

 

याचदिल्ली निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्यांदा शून्य वर आली आहे. त्यावर बोलताना ना. राणे म्हणाले कि आता ती खरी लायकी जनतेने त्यांना दाखवून दिले आहे. राहुल गांधी जिथे राहतात दिल्लीने त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. महाराष्ट्रात सुद्धा हेच झालं होतं. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि इथली महाविकास आघाडी यांची काय लायकी आहेत हे महाराष्ट्र जनतेने प्रथम आणि आता दिल्लीने दाखवून दिली आहे असेही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी कितीही पत्रकार परिषद घेतल्या तरीही कितीजण कितीवेळ त्यांच्यासोबत आहेत हे लवकरच समजेल आणि जशी त्यांची वज्र मुठ किती भक्कम आहे हे लवकरच समजेल अशीही टीका ना. राणे यांनी केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री यांनी संपर्क मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना बळ देणं, ताकद देणे यासाठी मी काम करेन. इथे भारतीय जनता पक्षाची संघटना वाढली पाहिजे, कार्यकर्त्यांना आधार मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकारमध्ये काम झाली पाहिजे या सगळ्याचा पाठपुरावा संपर्क मंत्री म्हणून मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना उबाठाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या केवळ चर्चा असून अशा चर्चेवर मी कोणती प्रतिक्रिया देत नाही, त्यामुळे पुढे काय होईल हे येणारा काळ ठरवेलअसेही ते म्हणाले.

 

अतिक्रमण हटवल्यानंतर आता मिरकरवाडा जेटीमध्ये 39 कोटी खर्च करून विकास कामे करायची आहेत.. त्यात कुठल्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, निधी कुठला खर्च झाला पाहिजे, कंपाउंड वॉलचे काम सुरू करायचा आहे यावर चर्चा आजच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाली. अतिक्रमण हटवल्यामुळे आम्हाला मिरकरवाडा येथे मोकळी जागा मिळाली आहे. आता तिथे उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यातल्या कामाला सुरुवात होणार असून त्यानुसार निधी खर्च होईल असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

 

केंद्रीय अर्थ संकल्पात केंद्र सरकारने मत्स्य खात्यासाठी फार मोठे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना योजना शेवटच्या लोकांपर्यंत कशी होईल, पैसे कसे पोहोचेल यासाठी संदर्भात चर्चा झाली. किनारपट्टीवर साखरेनाट्यापासून अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण नोटीस बजावून आदेश दिले आहेत त्याप्रमाणे मिरकरवाडा मॉडेल प्रमाणे काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले. तर अतिक्रमण हटवताना पोलीस विभागाने केलेल्या सहकायाबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे आभार मानले

.