रामेश्वर वाचन मंदिर येथे २०रोजी जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा

आचरा–अर्जुन बापर्डेकर :   श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून *जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा* आयोजित केलेली असून सदर स्पर्धेसाठी स्पर्धकाने *प्रसिद्ध लेखक कै. जयवंत दळवी यांच्या कोणत्याही पुस्तकावर कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १० मिनिटे परीक्षणात्मक बोलायचे आहे.* नावनोंदणीची अंतिम तारीख मंगळवार दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रथम येणाऱ्या १० स्पर्धकांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. बक्षिसे पुढीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक -रु.१५००/- व चषक, द्वितीय क्रमांक – रु.१२००/- व चषक, तृतीय क्रमांक – रु. १०००/- व चषक, उत्तेजनार्थ १-रु. ५००/-, उत्तेजनार्थ २-रु. ५००/-

नावनोंदणीची संपर्क क्रमांक ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी- ९४२१२६३३४६ व ०२३६५-२४६०१७ यावर त्वरित संपर्क साधावा.