Cyclone ‘Mocha’ wreaks havoc in Myanmar; The death toll stands at 81
Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले असून, बांग्लादेश आणि म्यानमारच्या सीमेवर चांगलेच थैमान घातले आहे.
रविवारी हे वादळ बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनारी भागावर धडकले. दरम्यान, अद्ययावत माहितीनुसार, म्यानमारमध्ये ‘मोचा’ चक्रीवादळातील मृतांचा आकडा ८१ वर पोहोचला आहे.
मोचा चक्रीवादळाने म्यानमारमध्ये मोठे थैमान घातले आहे. हजारो घरांची छते उडून गेली. काही भागांत पूरस्थितीही निर्माण झाली आहे. हजारो लोक विस्थापित झाले आहेत. म्यानमारमधील सिटवे, क्यूकप्यू आणि ग्वा टाऊनशिपमध्ये मोठे नुकसान झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब, मोबाईल फोन टॉवरही कोसळले आहेत. सिटवे बंदरात बोटी उलटल्या आणि लॅम्पपोस्टही उखडले आहेत.
Cyclone Mocha : बांगलादेशातील धोका कमी
बांगलादेशमधील कॉक्स मार्केटला धडकण्यापूर्वी, वादळ पूर्वेकडे वळल्याने येथील धोका बर्याच अंशी कमी झाला. कॉक्स बाजार या जगातील सर्वात मोठ्या निर्वासित छावणीतील 1,300 हून अधिक तंबू नष्ट झाले. तत्पूर्वीच अधिकार्यांनी छावणीतील सुमारे 3 लाख रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षित ठिकाणी हलवलेले असल्याने प्राणहानी टळली.