केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला गुरुवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार सकाळी 08.00 वाजता मिरकरवाडा, रत्नागिरी येथील मुख्य कार्यक्रमासाठी आरजीपीपीएल जेट्टी, दाभोळ, जि. रत्नागिरी येथे आगमन. सकाळी 08.05 वाजता आरजीपीपीएल जेट्टी, दाभोळ, जि. रत्नागिरी येथून प्रयाण. सकाळी 08.15 वाजता राधाकृष्ण समाज मंदीर हॉल, वेलदूर येथे आगमन. सकाळी 08.20 वाजता ते 09.10 वाजता मुख्य कार्यक्रम. सकाळी 09.15वाजता राधाकृष्ण समाज मंदीर हॉल, वेलदूर येथून प्रयाण. सकाळी 09.40 वाजता बर्थिंग जेट्टी येथे आगमन. सकाळी 09.45 वाजता बर्थिंग जेट्टी येथून प्रयाण. दुपारी 03.30 वाजता मिरकरवाडा, जि. रत्नागिरी येथे आगनम व राखीव. दुपारी 03.30 ते दुपारी 04.10 वाजता मिरकारवाडा गाव भेट व मच्छीमार यांच्याशी संवाद. दुपारी 04.15 वाजता मिरकरवाडा, जि. रत्नागिरी येथून प्रयाण.दुपारी 04.25 वाजता मिऱ्या येथे आगमन. दुपारी 04.20 ते 04.50 वाजता मिऱ्या गाव भेट व मच्छीमारांशी संवाद. इरोशन बंधाऱ्याला साईट भेट. सांयकाळी 05.00 वाजता मिऱ्या येथून प्रयाण व स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदीर रत्नागिरी येथे आगमन. सांयकाळी 05.00 वा. ते 06.30 वाजता केसीसी कार्ड, क्युआर कोड, आधार कार्ड/ई-श्रम कार्ड. सागर परिक्रमा पाचवे चरण समाप्त कार्यक्रम. रात्रौ 08.00 वाजता गोवा कडे प्रयाण.