Bullock Cart Race: Supreme Court Verdict on Bullock Cart Races Today; Everyone is focused on the result
मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर आज कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार आहे.तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा आज एकत्रित निकाल लागणार आहे. या कायद्यांना कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो. याकडे बैलगाडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.













