RATNAGIRI: भारतीय जैन संघटनेच्या कोकण विभागीय व रत्नागिरी जिल्हा – शहर पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा झाला उत्साहात

Inauguration ceremony of Konkan divisional and Ratnagiri district-city office bearers of Indian Jain Association

रत्नागिरी | प्रतिनिधी : दिनांक 14 मे रविवार रोजी भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष नंदकुमारजी सांखला, नाशिक व सचिव दीपकजी चोपडा, नाशिक यांचा रत्नगिरी दौरा उत्साहपूर्ण वातावरणात मरुधर भवन रत्नागिरी येथे पार पडला.

यावेळी भारतीय जैन संघटनेच्या कोकण विभागीय व रत्नागिरी जिल्हा – शहर पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. त्यामध्ये कोकण विभागीय उपाध्यक्ष महेंद्रजी गुंदेचा रत्नागिरी, कोकण कार्यकारिणी सदस्य संजीवजी गुंदेचा रत्नागिरी, ललितजी शहा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष – योगेश पोकरणा दापोली, रत्नागिरी जिल्हा सचिव मुकेश जैन वाकवली, रत्नागिरी शहर अध्यक्ष – चेतनजी गांधी, रत्नागिरी शहर सचिव प्रणयजी कामदार, रत्नागिरी शहर खजिनदार – निलेशज गांधी यांचा समावेश आहे.

यावेळी राज्याध्यक्ष यांनी येणाऱ्या पुढील काळात भारतीय जैन संघटना कसे समाजपयोगी कार्य करणार याची माहिती दिली व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला भारतीय जैन संघटना रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, रत्नागिरी जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.