कणकवली I मयुर ठाकूर : योगीयांचे योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सव २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कणकवलीत भालचंद्र महाराज संस्थान येथे साजरा होणार आहे. आश्रमात २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव होणार आहे. २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज पहाटे ५ :३० वाजता समाधीपूजन काकडआरती , सकाळी ८ : ३० वाजता धार्मिक विधी , भालचंद्र अनुष्ठान , महारुद्र महाभिषेक, दुपारी १२ :३० वाजता आरती , त्यानंतर महाप्रसाद , दुपारी १ वाजल्यापासून भजने , त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सवांतर्गत कीर्तन तर रात्री ८ वाजता दैनंदिन आरती होणार आहे.
Bhalchandra Maharaj death anniversary festival from 26th November in Kankavli…
३० नोव्हेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी दिन असून यादिवशी पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन , काकड आरती , सकाळी ८ वाजता भजने , १०.३० वाजता समाधीस्थानी मन्यूसूक्त पंचामृताभिषेक , दुपारी १२.३० वाजता आरती , दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी १ वाजता भजने , सायंकाळी ५ वाजता घोडे, उंट, तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत शहरातून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आरती होणार आहे. रात्री ११ वाजता अमृतनाथ नाट्यमंडळ म्हापण यांचे ‘कुर्मदासाची वारी’ हे दशावतारी नाटक होणार आहे. पुण्यतिथी महोत्सवाच्या कालावधीत सायंकाळी ४ वाजता महाभारतातील कथांवर आधारित कीर्तन महोत्सव होणार आहे. यात २६ नोव्हेंबर रोजी ह.भ.प. श्रेयश बडवे, पुणे यांचे ‘श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर ‘या विषयावर , २७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील ह .भ .प . चिन्मय देशपांडे यांचे ‘द्रौपदी स्थाली’, २८ नोव्हेंबर रोजी गोवा येथील ह .भ .प. विवेक जोशी यांचे ‘पार्थरथी हनुमान’ तर २९ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथील वैभव ओक यांचे ‘श्रीकृष्ण लक्ष्मणा विवाह ‘या विषयावर कीर्तन होणार आहे. भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.