आम. नितेश राणे यांचा कासरल मध्ये ठाकरे शिवसेनेला जोरका झटका

माजी सरपंच, माजी सभापतींच्या मुलासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

संतोष राऊळ I कणकवली : मातोश्रीचे कट्टर समर्थक असलेल्या कणकवली पं. स. चे माजी सभापती कै. प्रमोद सावंत यांचे चिरंजीव ऍड. प्रसाद सावंत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत,कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्या सह कासरल गावातील शिवसेना कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.या प्रवेशाने ठाकरे सेनेला जोरका झटका लागला आहे. या प्रवेशाने आमदार नितेश राणे हे शिवसेनेला धक्के पे धक्का देत आहेत.

Common. Nitesh Rane's hard blow to Thackeray Shiv Sena in Kasara

18 डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात आमदार नितेश राणेंनी निवडणुकीआधीच ठाकरे सेनेला हादरे द्यायला सुरुवात केली आहे. आ. नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीचे कट्टर समर्थक असलेल्या कणकवली पं स चे माजी सभापती कै. प्रमोद सावंत यांचे चिरंजीव ऍड. प्रसाद सावंत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत,कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्यासह सुमित्रा मधुकर कोकम, लक्ष्मी विजय कोकम, लक्ष्मी पांडुरंग कुळये, राजश्री रघुनाथ भामले, संध्या संतोष भामले, रेश्मा रमेश कूळये, वैशाली विश्वनाथ तिर्लोटकर, प्रथमेश पांडुरंग कुळये, रोशन रमेश कुळये, राजेश रमेश कूळये, संतोष रघुनाथ भामले, संतोष सिताराम कुळये, संजय विश्वनाथ तिर्लोटकर, प्रकाश बळीराम तिर्लोटकर, प्रशांत विजय कुळये यांच्या सह गावातील प्रमुख ठाकरे सेना कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ओम गणेश बंगल्यावर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, माजी उपसभापती महेश गुरव, माजी सभापती संजय शिरसाट, दिलीप तळेकर, जिल्हा बँक संचालक ऍड. समीर सावंत, भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.