SAWANTWADI: सावंतवाडीत २३ रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp at Sawantwadi on 23rd

सावंतवाडी । प्रतिनिधी : दहावी, बारावी नंतर विद्यार्थ्यांना “करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन शिबीर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या शिबिरात दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज माहिती, करिअर प्रदर्शनी आदी विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन होणार आहे.
सावंतवाडी सालईवाडा येथील रविंद्र मंगल कार्यालय येथे २३ मे रोजी सकाळी ९ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा तसेच करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahacareer.globalsapio.com/ या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे