सिंधुदुर्ग I मयुर ठाकूर : सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने, बाल दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्त बालक जतन अभियान सप्ताह ला सुरुवात करण्यात आली.
On behalf of Nashabandi Mandal, on behalf of the Children’s Day, the addiction free child protection campaign started..!
यावेळी नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी बालकांच्या मूलभूत अधिकारात बालकांना आनंददायी जीवन जगण्याचा अधिकार महत्त्वाचा असतो. पण जगण्याची बदलती जीवनशैली आणि वाढती व्यसनाधीनता मुलांच्या आनंदायी जगण्यावरच गदा आणत आहे. यासाठी बालपंचायतीच्या, बाल सभेच्या माध्यमातून व्यसनांच्या विरोधात बालकांनी आवाज उठविला पाहिजे असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. शिवाय व्यसनमुक्तीच्या साप शिडीच्या खेळाच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत मुलांनी. माहिती घेऊन मुलांनी व्यसनांपासून लांब राहावे यासाठी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. तांबे, सौ. सावंत, श्री. कारेकर, श्री. नारकर, श्री. पाटकर, सौ. नलावडे, श्री. सावंत, सौ. मोरये, सौ. मोहिते, श्री. खोराडे, श्री. व्ही. जे. तांबे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.