Inauguration and naming ceremony of the new building on May 21 of the hostel construction project by the students of National Service Committee.
रत्नागिरी: रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा समिती च्या विद्यार्थिनी वसतिगृह निर्माण प्रकल्प च्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा रविवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
बोर्डिंग रोड, सन्मित्र नगर येथे ही संस्थेची नवीन वास्तु उभारण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाहक श्री.विठ्ठलराव कांबळे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून श्री अजय जी पित्रे,अध्यक्ष, पित्रे फाउंडेशन,पुणे हे उपस्थित राहणार आहेत.
त्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या वास्तूच्या उद्घाटन व नामकरण सोहळा कार्यक्रमा साठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष, संतोष पावरी, उपाध्यक्ष, नाना मराठे,सचिव, अनिरुद्ध लिमये, कोषाध्यक्ष ,प्रशांत पाध्ये. इतर कार्यकारी मंडळ सदस्य व संस्थेचे सर्व सभासद यांनी केले आहे.












