असलदे विकास सोसायटीचे संचालक दिनकर दळवी यांचे निधन

Google search engine
Google search engine

कणकवली I मयुर ठाकूर : असलदे तावडेवाडी येथील रहिवाशी व रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि, असलदे ज्येष्ठ संचालक, माजी व्हॉईस चेअरमन, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने ९.३० वाजता मुंबई नालासोपारा येथे निधन झाले. त्यांच्यावर शोकांकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Dinkar Dalvi, Director of Aslade Development Society passed away

दिनकर दळवी हे असलदे गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रभागी असायचे.त्यांच्या दुःखद निधनाची निधनाचे वृत्त समजतात असलदे गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.