तेरवण पेढरेवाडीच्या सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
दोडामार्ग l प्रतिनिधी :तेरवण पेढरेवाडी येथे आ. दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी सभागृहसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे भूमीपूजन पेंढरेवाडी ग्रामस्थानी केले.
यावेळी विजय गवस, दत्ताराम गवस, पांडुरंग गवस, पांडुरंग गवस, शंकर गवस, नारायण गवस, अशोक गवस, विश्राम चव्हाण, तुकाराम गवस, सत्यवान गवस, आनंद गावडे, विष्णु गवस, महीला व ग्रामस्थ उपस्थित होते. पेढरेवाडी ग्रामस्थांची सभागृहाची मागणी मान्य झाल्याने वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.














