NIVALI-RATNAGIRI: निवळी मालपवाडी येथे जुगार अड्डयावर पोलिसांची धाड

Police raid gambling den at Nivali Malpawadi

रत्नागिरी : प्रतिनिधी :  तालुक्यातील निवळी-मालपवाडी येथे एका दुकानाच्या आडोशाला मटका जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली. साहित्यासह 630 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाई शुक्रवारी 19 मे रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास करण्यात आली. प्रफुल्ल दत्ताराम रहाटे (47,रा. हातखंबा भुतेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ग्रामीण पोलीस मालपवाडी जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना आदित्य कम्युनिकेशन या दुकानाच्या मागील बाजूस दुकान गाळ्याच्या आडोशाला जुगार खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित मुंबई मटका नावाचा जुगार चालवत होता.त्याच्याकडून साहित्यासह ६३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.