MUMBAI: दादर – पुणे मार्गावर दर १५ मिनिटांनी ई-शिवनेरी धावणार

E-Shivneri will run every 15 minutes on Dadar-Pune route

पुणे – मुंबईतल्या प्रवाशांना फायदा

मुंबई : महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाला पुणे स्टेशन ते दादर दरम्यान ५ ई-शिवनेरी बसेस प्राप्त झाल्या आहेत. दादर बस स्थानकातून शुक्रवारी १९ मे ला पहिली ई-शिवनेरी बस औंधला (पुणे स्थानक) रवाना झाली. या बसेस औंध आणि निगडी मार्गे एका दिवसात १५ फेऱ्या करणार होत्या. मात्र येत्या दोन दिवसात या बसेसच्या आणखी ३० फेऱ्या सुरू होणार असल्याने पुणे – मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

दादर – पुणे मार्गावरील पहाटे आणि सायंकाळी दर १५ मिनिटाच्या अंतराने या बसची एक फेरी चालवण्यात येईल. दुपारी १२ ते १ दरम्यान विश्रांती नंतर पुन्हा दर १५ मिनिटांनी एक फेरी चालवण्यात येईल.

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे ते पुणे दरम्यान पहिली ई-शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन मंडळाने या बसेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.