भिक्खू संघाची उपसकांसोबत लांजा शहरातून काढण्यात आली धम्म संक्रमण यात्रा

The Bhikkhu Sangha along with the devotees were taken out from the city of Lanja on a Dhamma Transit Yatra

शहरातील शिवपार्वती हॉल या ठिकाणी सुरू आहे बौद्ध धम्म परिषद

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे आयोजन

लांजा | प्रतिनिधी : लांजा येथे सुरू असलेल्या बौद्ध धम्म परिषदेचे निमित्ताने शनिवारी २० मे रो रोजी भिक्खू संघाची उपसकांसोबत लांजा शहरातून धम्म संक्रमणयात्रा काढण्यात आली. यावेळी बुद्धम् शरणम् गच्छामि चा जयघोष शहरात घुमला.दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा आणि लांजा तालुका शाखेच्या वतीने लांजा येथील शिवपार्वती हॉल या ठिकाणी शनिवारी २० आणि २१ मे असे दोन दिवस बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी भिक्खू संघाची उपसकांसोबत लांचा शहरातून धम्म संक्रमण यात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव आणि भिख्खू सहभागी झाले होते. यानंतर शिवपार्वती हॉल या ठिकाणी भन्ते महेंद्र बोधि थेरो मुंबई यांनी सूत्रपठण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आला. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

या धम्म परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई येथील पूज्य भन्ते महेंद्र बोधी थेरो, अमरावती येथील पूज्य भन्ते सारीपुत्त थेरो,मुंबई येथील पू. भन्ते विमलरत्ने महाथेरो, नागपूर येथील पू.भन्ते धम्मरक्षित थेरो आणि पू.भन्ते प्रज्ञानंद महाथेरो हे उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव व्ही.एस मोखळे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन. कांबळे यांनी केले. त्यानंतर भन्ते विमलरत्ने महाथेरो यांचे भगवान बुद्धांचा कार्यकारणभाव सिद्धांत या विषयावर मार्गदर्शन झाले. त्यानंतर १२.२० ते १.३० या वेळेत डॉ. ह.नी सोनकांबळे यांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध धर्म या विषयावर मार्गदर्शन, त्यानंतर दुपारी २ वाजता व्ही. एस मोखळे यांचा समाजाकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला . त्यानंतर व्ही. एस. मोखळे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती या विषयावर मार्गदर्शन झाले, दुपारी ३ ते ४ बी.जी बनसोडे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कायदेविषयक विचार या विषयावर तर सायंकाळी ४ राजू केदारे यांचे गृहस्थी जीवनासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन झाले .भन्ते प्रज्ञानंद महाथेरो यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित धम्म प्रचाराचे मार्ग या विषयावर मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपस्थित होते.