मधाचे गाव हि संकल्पना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवून मधमाशा पालन हा उद्योग राज्यात मधुक्रांती आणेल असा विश्वास खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केला.
मध संचालनालय महाबळेश्वर येथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त आयोजित मधुमित्र पुरस्कार सोहळ्यात श्री साठे बोलत होते यावेळी वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, विध्यसागर हिरमुखे, बिपीन जगताप, डी आर पाटील आदी उपस्थित होते.
श्री साठे पुढे म्हणाले “राज्यातील भौगोलिक वातावरण मधमाशांना अत्यंत उपयुक्त आहे. मधमाशापालन हा शेतकऱ्यांना खूप फायदेशीर उद्योग आहे. राज्यात मधउद्योग वाढवून मधुक्रांती साठी सर्वानी या खादी च्या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.
यावेळी अन्शू सिन्हा म्हणाल्या मध केंद्र योजना प्रभावी राबविण्यासाठी मधाचे गाव हि संकल्पना महत्वाची आहे. शेतकरी वर्गाने या उद्योगातून प्रगती करावी.
या कार्यक्रमात मधमाशा पालनात प्रभावी काम करणाऱ्या मधपांळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये मधुसखी हा पहिला पुरस्कार पाटण येथील रोहिणी पाटील यांना देण्यात आला तर दुसरा पुरस्कार लातूरचे दिनकर पाटील आणि तिसरा पुरस्कार अमरावती येथील सुनील भालेराव यांना देण्यात आला यावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा देखील सन्मान करण्यात आला.
मध संचनालयातील प्रक्रिया विभाग आणि हनी पार्कचे उदघाटन यावेळी श्री साठे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे स्वागत डी आर पाटील यांनी केले तर सूत्र संचालन बिपीन जगताप यांनी केले आभार रमेश सुरुंग यांनी मानले.