अपघाती निधन पावलेल्या संतोष सारंग याला गाबीत बांधवांतर्फे आर्थिक मदत

दिनांक २ मार्च २०२५ रोजी दुपारनंतर तारामुंबरी मिठमुंबरी खाडी क्षेत्रात मुळे (शिंपले) काढण्यास गेलेला तारामुंबरी- मुरमणेवाडा येथील मच्छीमार संतोष तुकाराम सारंग यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर त्याचा देह सायंकाळी ५.०० च्या सुमारास मिठमुंबरी येथील बागवाडीच्या समोरील बीचवर आढळून आला. त्याच्या मृत्यू नंतर गाबीत समाजातील मुंबई स्थित व देवगड येथील गाबीत बांधवांनी एकत्रित येऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सोशल नेटवर्किंग साईटवर आवाहन केले. त्या आवाहनाला गाबीत समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला व त्या माध्यमातून सुमारे १,३५,०००/- रुपये गोळा झाले. सदर रक्कम दिवंगत संतोष सारंग यांची पत्नी श्रीमती शितल सारंग यांच्या बचत खाते मध्ये बॅक ऑफ इंडिया खात्यात वर्ग करण्यात आले असून सदर संतोष सारंग यांचा पुत्र कु.मंगेश सारंग याच्या पुढील पंधरावी इयत्तेचा संपुर्ण शैक्षणिक खर्च हा विजयदुर्ग येथील विष्णू सारंग प्रतिष्ठानने उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर मदत रक्कम उभारण्यासाठी सर्वतोपरी समाज बांधव श्री.रामचंद्र यशवंत सारंग ऊर्फ बबन सारंग तसेच विष्णू प्रतिष्ठानचे श्री रामचंद्र दत्ताराम सारंग , श्री राजकुमार राजाराम सारंग , श्री अनंत गोकुळ सारंग, श्री सुदर्शन लक्ष्मण सारंग यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर जमा झालेली रक्कम रुपये एक लाख पस्तीस हजार ही सारंग कुटुंबाकडे आज सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्री रामचंद्र उर्फ बबन यशवंत सारंग , श्री रामचंद्र दत्तात्रय सारंग , श्री अनंत गोकुळ सारंग , श्री सुजय गोपाळ धुरत , श्री हृदयनाथ रामचंद्र तारी , श्री लक्ष्मण विठ्ठल तारी , श्री सुहास पराडकर, श्री महादेव मुणगेकर, श्री रमेश मनोहर तारी , सौ.उषःकला केळुसकर आदि गाबीत समाज भगिनी आणि बांधव याप्रसंगी उपस्थित होते.