रत्नागिरी जिल्हा मजूर संघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची घेतली भेट

मजूर सहकारी संस्थांच्या अडीअडचणी संदर्भात दिले निवेदन
लवकरच सहकार मंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे दिले आश्वासन

चिपळूण (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ मर्यादित या संघटनेचे उपाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या माध्यमातून आ. शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली मजूर सहकारी संस्थांच्या अडीअडचणी व मागण्यांबाबत स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील निवेदन नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांना रत्नागिरी येथे देण्यात आले. यावेळी लवकरच सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक लावण्याची ग्वाही ना. अजित पवार यांनी यावेळी दिली.

राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ मर्यादित उपाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ मर्यादितचे चेअरमन संजीव कुसाळकर, उपाध्यक्ष भरत खंडाईत, व्यवस्थापक आप्पा खराडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्हा मजूर संघाच्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेत मजूर सहकारी संस्थांच्या अडीअडचणी मागण्याबाबत स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील निवेदन दिले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा मजूर संघाचे चेअरमन विनायक शिवगण, उपाध्यक्ष मयूर खेतले, माजी चेअरमन राकेश जाधव, संचालक श्री. जोशी, लांजा राजेंद्र घाग, शरद साळवी, रमेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.