चिपळूण (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी केलेल्या श्रमाचा, उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे. त्यांचे अभिनंदन करणे. जिल्ह्याची अधिक औद्योगिक प्रगती व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार -सामाजिक जबाबदारी, जागतिक उद्योजक पुरस्कार, विशेष उद्योजकीय पुरस्कार, देण्यात येणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष श्री राजू सावंत यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार (Ratnagiri District Entrepreneurship Award) रत्नागिरी जिल्ह्यात कमीतकमी पाच वर्षे यशस्वीपणे औद्योगिक उत्पादन करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या उद्योजकास हा पुरस्कार देण्यात येईल. रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार- सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility Award) सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सीएसआर फंड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करून समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी उद्योजक किंवा औद्योगिक समूहाला कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार देण्यात येईल. जीवन गौरव पुरस्कार (Life Time Achievement Award) रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक ज्याने 25 वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग केला आहे. नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून उद्योग यशस्वी केला आहे व सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. अशा उद्योजकास जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार (Best Startup Award) सर्वोत्कृष्ट स्टार्टअप हा पुरस्कार अपवादात्मक नवकल्पना, वाढीची क्षमता उद्योजक वृत्ती. नाविन्यपूर्ण मानके स्थापित करतो सकारात्मक बदल घडवतो. रत्नागिरी जिल्ह्या प्रभावित करतो अशा स्टार्ट अपना दिला जाणार आहे.
जागतिक उद्योजक पुरस्कार (Global entrepreneur in the year) वर्षातील जागतिक उद्योजक हा पुरस्कार ज्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून केली आहे आणि राज्य देश आणि जागतिक पातळीवर यश मिळवले आहे.
विशेष उद्योजकीय पुरस्कार (Special Entrepreneurship Award) एखाद्या होतकरू उद्योजकाने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेने उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उद्योग, व्यापार किंवा शेती या कोणत्याही क्षेलात आपले योगदान देऊन आपला ठसा उमटवला आहे. (कुशल, अकुशल स्थानिक कामगारांना, बचत गटांना रोजगार व बाजारपेठ मिळवून दिली आहे) अश्या उद्योजकाला किंवा उद्योजक समूहाला हा पुरस्कार देण्यात येईल. अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली.
पुरस्कारासाठी उद्योजकाला स्वतः किंवा त्याच्या वतीने इतर कोणताही उद्योजक किंवा संघटनेला अर्ज करता येईल. निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल. पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी स्वतः उपस्थित राहुन पुरस्कार स्वीकारणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी दिनांक २० एप्रिल २०२५ पूर्वी आपले अर्ज https://frdeci.org.in/award-form/या लिंक वर किंवा फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, गणेश मेटल वर्क्स डी 19 मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.