मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर
सिंधुनगरी | बाळ खडपकर
जनतेचे प्रश्न सोडवणे, नागरिकांना सुविधा देणे यासाठी आपला कटाक्ष असेल, सिंधुदुर्ग जिल्हा माझ्या आवडीचा जिल्हा आहे. या जिल्ह्याशी माझं भावनिक नातं आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला निधी वेळेत व शंभर टक्के खर्च होईल. जिल्हा परिषदेतील गतिमानता आपल्या कामातून दिसेल अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली. सिंधुदुर्ग नगरीत साजरा झालेला पहिला महोत्सव व त्यावेळी या जिल्ह्यात काम करतानाच्या आठवणी ना त्यांनी उजाळा दिला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सुरू असलेले शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे कसे करता येईल व जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरणातून जिल्हा परिषद संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी प्रत्येक खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे ही अपेक्षा आहे. यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी आज पत्रकारांची बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी आज संवाद साधताना रवींद्र खेबुडकर म्हणाले, आपण या जिल्ह्यात यापूर्वी काम केले आहे. अनेक वर्षानंतरही जिल्हा परिषद भवन आणि त्याचा परिसरात यामध्ये सुधारणा झालेली दिसून येत नाही. अनेक समस्या आजही आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरणाबरोबरच या संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्राधान्याने प्रयत्न राहतील. जिल्हा परिषद शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे यासाठी प्रत्येक खाते प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे ही अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना अपेक्षित असलेले काम जिल्हा परिषद मार्फत करण्याचा प्रयत्न राहील. शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रात अधिक दर्जेदार काम होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा परिषद प्रशासकीय कारभार जलद गतीने व प्रभावि पणे करण्यासाठी आवश्यकते उपाय योजले जातील . बंद पडलेली सी सी टी व्ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल. प्रत्तेक कर्मचा ऱ्यानी कामाच्या वेळेचे बंधन पाळने आवश्यक असून त्यावर नियंत्रण ठेवले जाईल .असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले