Lanja ST Agar is ready for the return journey of the servants
मुंबई, बोरिवली, कल्याण मार्गावर लांजा एसटी आगाराच्या चार जादा फेऱ्या
25 मे पर्यंत आरक्षण फुल्ल
लांजा (प्रतिनिधी) मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तालुक्याच्या गावागावात दाखल झालेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा एसटी आगार सज्ज झाले आहे. दिनांक २५ मे पर्यंत मुंबई, बोरिवली, कल्याण मार्गावर दररोज चार जादा फेऱ्या सोडल्या जात आहेत.
यावर्षी मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आणि कोकणातील आंबा ,करवंदे, फणस यासारख्या अस्सल कोकणी मेव्यांचा आस्वाद घेण्यासाठी मुलांबरोबरच गावागावांमध्ये दाखल झालेल्या पालकांना आणि चाकरमान्यांना आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले आहेत. या चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लांजा एसटी आगाराने गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे यासाठी गावागावातून मुंबईला परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक मे पासूनच आगारातून जादा जागा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये लांजा बोरिवली १, लांजा मुंबई १,लांजा कल्याण १, तसेच काजीर्डा बोरिवली १ या मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. दिनांक २५ मे पर्यंत दररोजच्या चारही जादा फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
ज्यादा गाड्यांबरोबरच नियमित लांजा बोरिवली ही बसलेली सोडण्यात येत आहे .ज्यादा बस गाड्यांचे आरक्षण लांजा बस स्थानक या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याखेरीज ग्रुप बुकिंग द्वारे जागा गाड्या सोडण्याची सुविधा आगारा मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तरी तालुक्यातील चाकरमानी प्रवाशांनी या जादा एसटी बसेसच्या लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर यांनी केले आहे.












