दापोली l प्रतिनिधी: 2024 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावे लागलेले रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना ठाकरे प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर संजय कदम हे ठाकरे गटातून बाहेर पडून संजय कदम भाजपा मध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू कोकणचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय कदम यांना गळाला लावत आज अखेर शिवसेनेत प्रवेश करुन घेतला.
संजय कदम यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. माजी आमदार संजय कदम यांनी सरपंच, , जिल्हा परिषद उपाध्यक्ष, एक वेळा आमदार,जिल्हाप्रमुख,
अशा पदांवर काम केले आहे.
आज झालेल्या पक्षप्रवेशानंतर कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना उपनेतेपदी म्हणून माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी माजी सभापती किशोर देसाई यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते मा.रामदासभाई कदम, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेशदादा कदम, ,माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील या विशेष कार्यक्रमात देण्यात आले.











