खरेदी-विक्री संघात नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना लाभ द्या : सुनिल राऊळ

Google search engine
Google search engine

सह्याद्री फाउंडेशनतर्फे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी

पन्नास वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या  सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघासारख्या जुन्या संस्थेलाही एक नवी झळाळी मिळणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञान कसं आणण्यात येईल या दृष्टीने नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, असे आवाहन सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.

सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने सह्याद्री फाउंडेशनचे संचालक माजी सभापती प्रमोद सावंत व कंझ्युमर्स सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद गावडे हे दोघेही खरेदी विक्री संघावर निवडून आले आल्याबद्दल त्यांचा सत्कार सुनिल राऊळ व माजी नगराध्यक्ष तथा सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद तावडे, सचिव सुहास सावंत, माजी सचिव ॲड. संतोष सावंत, अजय गोंदावळे, माजी अध्यक्ष विजय चव्हाण, शशिकांत मोरजकर, मोहिनी मडगावकर, राजन राऊळ, अशोक सांगेलकर, दीनानाथ नाईक, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, अमित परब, आबा केळुसकर, योगेश शेटये, समीर पालव आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, सह्याद्री फाउंडेशनमध्ये जे जे कार्यरत आहेत ते आतापर्यंत सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रात चमकत आहेत. प्रमोद गावडे आणि प्रमोद सावंत हे दोघेही कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता या संघावर नवनवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल याकडे लक्ष द्यावे.

यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत म्हणाले, मी अनेक पदावर कार्य केला आहे परंतु आता खरेदी-विक्री संघावर मला ही संधी शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली त्याचा निश्चितच आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी करे न सर्वांच्या सहकार्यामुळे मी निवडून येऊ शकलो. तर प्रमोद गावडे यांनी पन्नास वर्षाहून अधिक काळ या संघाला झाली आहेत. कंझ्युमर्स सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना परवडेल असे खत पुरवठा आम्ही करतो आणि या संस्थेला उचित अवस्थेत आणले आता निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने खरेदी विक्री संघात नवनवीन बदल केले जातील. सह्याद्री फाउंडेशनने आम्हा दोघा संचालकांचा जो गौरव केला तो खरोखरच आम्हाला उभारी देणार आहे, अशा शब्दांत आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष सावंत तर आभार प्रल्हाद तावडे यांनी मानले.

Sindhudurg