‘माहेरून पालकांकडून 50 लाख आण’; हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण

‘Bring 50 lakhs from parents ‘; Beating a married woman for dowry

विवाहात हुंडा दिला नाही म्हणून तुझ्या माहेरून ५० लाख आण म्हणून पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करीत मानसिक त्रास 

सोलापूर : माहेरून तुझ्या आई-वडिलांकडून ५० लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फौजिया इब्राहिम खान (रा. ददापुरे कॉम्प्लेक्स, होटगी रोड) यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दरम्यान, सासरी नांदताना घरातील किरकोळ कारणातून सासरच्यांनी छळ केला. विवाहात हुंडा दिला नाही म्हणून तुझ्या माहेरून ५० लाख आण म्हणून पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करीत मानसिक त्रास दिला. मारहाण देखील केली. विवाहात मानपान नीट केला नाही, हुंडा घेऊन ये म्हणून पती, सासू, दिर, नणंद यांनी जिवे मारण्याची धमकी देखील दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

नोव्हेंबर २०१९ ते ३ मे २०२३ या काळात सासरच्यांनी खूप त्रास दिल्याचेही फौजिया खान यांनी पोलिसांना सांगितले. यावरून पती इब्राहिम खान, सासू नसीमा इस्माईल खान, नसरीन आरिफ शेख, फातिमा मेहताब मास्टर, आरिफ शेख (सर्वजण रा. नालासोपारा, वेस्ट मुंबई) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार मणुरे तपास करीत आहेत.

Dailyhunt