Rajapur Urban Co-op Bank General – Vice President Prasad Moharkar
राजापूर अर्बन को-ऑप बँकेच्या शृंगारतळी शाखेचा दिमाखात शुभारंभ
गुहागर | प्रतिनिधी : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून आज राजापूर अर्बन को-ऑप बँकेकडे पाहीले जाते. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आपण शृंगारतळी शाखा सुरू करत आहोत, आपला पाठींबा व साथ हवी आहे. असे प्रतिपादन राजापूर अर्बन को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी केले.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे राजापूर अर्बन को- ऑप बँकेच्या १२ व्या शाखेचा उदघाटन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसाद मोहरकर यांनी यापुढे म्हणाले की, कोकणात सहकार रूजण्यास उशीर झाला असला तरी आता तो खूप वाढतो आहे. विश्वासाहार्ता, पारदर्शकता आणि प्रामाणीकपणा जपलेली व ग्राहकांच्या अडीअडचणीच्या वेळेस सहकाराचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य करणारी अशी आपली राजापूर अर्बन को-ऑप बँक आहे. एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सूपंत या उंक्तीप्रमाणे सर्वांच्या पाठीशी उभी राहणारी बँक म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यात नावलौकीक प्राप्त केला आहे. अशी ही आपली सर्वांची बँक आजपासुन शृंगारतळी येथे पाऊल ठेवत आहे.
सर्वसामान्यांची आर्थिक गरजा पूर्ण करताना अभिमान होत आहे. सर्वसामान्य ग्राहक बँकेकडे येतो आणि हक्काने आपली आर्थिक पुंजी बँकेकडे देतो किंवा बँकेंकडून आर्थिक सहकार्य घेऊन आपली स्वप्न पूर्ण करतो. बँकेने सुरूवातीपासून
अत्याधुनिकरणाची कास धरलेली आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा ही सरकारी आणि बँकांच्या तोडीला सेवा देण्याचा प्रामाणीक प्रयत्न जोपासला आहे. यापुढे बँक प्रगतीची नवनवीन शिखरे पार करेल. यासाठी आपली साथ, पाठींबा हवा आहे आणि तो मिळेल असा विश्वास शेवटी व्यक्त केला.
यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे,
शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे, बँकेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शेखरकुमार अहिरे, व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर,
शाखाधिकारी आरिफ कर्णेकर आदी उपस्थित होते.
चौकट :
पहिल्याच दिवशी एक कोटीची ठेवी
पहिल्या दिवशी १ कोटीची
ठेवी व १०० खातेदार तयार करत बँकेने गुहागर तालुक्यात दमदार पाऊल ठेवले
आहे.