DAPOLI: दापोलीत ‘एक तालुका एक उत्सवा’च्या धर्तीवर होणार संभाजी महाराजांची जयंती साजरी

Sambhaji Maharaj’s birth anniversary will be celebrated in Dapoli on the lines of ‘One Taluka One Utsava’

दापोली | प्रतिनिधी: धर्मविर छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान दापोली च्या वतीने दिनांक ०१ जून २०२३ रोजी केळसकर नाका (दापोलीचा राजा उत्सव मंडप) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार) साजरी करणेत येणार आहे.

महाराजांची पालखी मिरवणूक सायंकाळी ठिक ०३ : ३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक केळसकर नाका – स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग – पोस्ट गल्ली – लोकमान्य टिळक चौक – नारद नाका बाजारपेठ – मच्छिमार्केट – एसटी स्टँड मार्गे केळसकर नाका दापोलीचा राजा उत्सव मंडप कार्यक्रम स्थळ अशी असेल. त्यानंतर ठीक ०६ : ३० वाजता संभाजी महाराजांच्या पराक्रमा विषयी व्याख्यानमाला होईल. साय. ठिक ०७ : ०० वाजता पोवाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सदर उत्सव एक तालुका एक उत्सव या धर्तीवर आयोजित केला आहे, त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त हिंदू बांधव आणि शिवप्रेमींनी या उत्सवात सहभागी होऊन अखंड हिंदुत्वाची झलक दाखवावी असे आवाहन प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.