Bulldozers will move on unauthorized constructions in Awashi Lote
खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावरील आवाशी व लोटे परिसरात महामार्गाच्या संपादित जागेतील गटारांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी २५ जणांना राष्ट्रीय महामार्ग खात्याने नोटीस बजावल्या
आहेत. येत्या ७ दिवसात ही बांधकामे स्वत:हून स्वखर्चाने न हटवल्यास बुलडोझर फिरवण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे परशुराम घाट वगळता अन्य ठिकाणचे
चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणानंतर आवाशी व।लोटे परिसरात महामार्गाच्या गटारांवर अनधिकृतपणे पक्के बांधकाम व खोके उभारण्यात आले आहेत. आवाशी व लोटे परिसरात महामार्गाच्या संपादित।जागेमध्ये केलेली बांधकामे, टपऱ्या व इतर अतिक्रमणे करणाऱ्यांना भारतीय महामार्ग खात्याने अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.