Wild birds entered the nature with the help of monsoon
‘पावशा’ पक्ष्याचे आगमन ने शेतकरी सुखावला
आधुनिक युगातही शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकेतांवर विश्वास
देवेंद्र जाधव | खेड : उन्हाच्या काहीली ने प्रत्येकाचा जीव कासावीस होत आहे अंगातून लागलेल्या घामाच्या धारा यावर मान्सून चे आगमन च थंडावा देणारे आहे मात्र या मुळे साऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे खिळल्या असून वरून राजा आता कधी हजेरी लावतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असले तरी उपग्रहाच्या कक्षेतून मान्सून कोकणा दाखल होण्या साठी जून ची वाट बघावी लागणार असली तरी रान पक्षी मॉन्सून चा सांगावा घेऊन दाखल झाले आहेत पावशा सारखा पक्षी पेरते व्हा चा सांगावा घेऊन निसर्गात दाखल झाला आहे
आधुनिक काळाच्या अवकाशातील उपग्रहांच्या भाऊ गर्दीत अजूनदेखील अनेक शेतकरी पारंपरिक नैसर्गिक असलेल्या संकेतावर विश्वास ठेवत आहेत.
त्यामध्ये चातक पक्षाचे अर्थातच स्थानिक भाषेत पावशाचे आगमन आणि त्याची पेरते व्हा… अशा
सुरावटीत लक्ष वेधून घेणारा आवाज शेतकऱ्यांनी ऐकला म्हणजे मान्सून उंबरठ्यावर आल्याचा विश्वास
व्यक्त केला जात आहे.
निसर्गातील होणाऱ्या बदलांची सर्वप्रथम जाणीव प्राणी व पक्ष्यांना असते. त्या जाणिवेतूनच प्राणी,
पक्ष्यांच्या हालचाली व स्वरात बदल होत असतात. या बदलांचे संके त पूर्वापार माहीत असलेला शेतकरी
वर्ग मान्सूनचे आगमन कधी होईल याचा अंदाज बांधत असतो. निसर्गचक्राप्रमाणे मोहिनी नक्षत्रात पावसाचा शिडकावा झाल्यावर शेतीच्या कामांना सुरुवात होते. मृग नक्षत्रात शेतीची कामे वेग घेऊ
लागतात. पावसाळा देखील हळूहळू आपले बस्तान बसवितो. मान्सूनच्या आगमनाची वर्दी देण्याचे काम शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळख असलेल्या चातक
पक्ष्याकडून केले जातो. स्थानिक भाषेत पावशा म्हणून ओळख असलेल्या पक्ष्याचे आगमन शेतशिवार परिसरात झाले आहे त्या मुळे मान्सून
लवकरच कोकणची वेस ओलांडेल होईल, असा।अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होतो. त्यातच पावशाची ‘पेरते व्हा… पेरते व्हा’ अशी सुरावट सुरू होताच
शेतकरी मनात मान्सूच्या आगमनाची खात्री ठेवून कामांना सुरुवात करतो. मृग नक्षत्रात लाल
रंगाचे मखमली नाजूक किडे शेतशिवारात वावरू करू
लागल्यावर पाऊस आता हमखास बरसणार अशी अटकळ शेतकरी बांधतो. एकूणच आधुनिक संगणकीय, डिजिटल युगात आजदेखील शेतकरी
पारंपरिक संकेतांवर विश्वास ठेवत आहे.
दरम्यान दरवर्षी विविध संस्था पाऊस इतका बरसेल वगरे ठोक ताळे बांधत असतात मात्र भारतीय हवामान विभाग अर्थात (आय एम डि ) अवकाशातील लघु उपग्रहाच्या मदतीने मॉन्सून ची वाटचाल टिपत आहे त्या मुळे अवघ्या काही दिवसात च मॉन्सून कोकणात दाखल होऊन गर्मी ने हैराण झालेल्या प्रत्येक जीवाला सुखावणारा ठरणार आहे त्यामुळे मॉन्सून लवकरच दाखल होण्याचा सांगावा घेऊन आलेले रानपक्षयना देखील मॉन्सून ची प्रतीक्षा लागून राहिली आहे