चिपळूण येथे चार ठिकाणी छापे टाकून अवैध हातभट्टी दारूचा मोठा साठा पकडला; चारजणांवर गुन्हा

 

रत्नागिरी | प्रतिनिधी :  राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभाग व पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे चिपळूण यांनी संयुक्तपणे मौजे वालोपे व पेढे ता. चिपळूण या परिसरात वाशिष्टी नदीकिनारी अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर व मौजे चिंचघरी ता. चिपळूण येथे हातभट्टी गावठी दारू विक्री केंद्रावर अशा एकूण चार ठिकाणी छापे टाकून सू. 4700 ली. रसायन व हातभट्टी गावठी दारू 206 ली. असा एकूण रु. 1,35,240/- किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्धेमाल जप्त करून रसायन व इतर साहित्य जागीच नाश करण्यात येऊन आरोपीत इसम 1 ) महेश नंदकुमार नागवेकर 2) मंदार मधुकर दिवेकर 3) मनोज दशरथ बुरटे 4) आशीष सुधाकर चाळके अशा चार आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) (फ) अन्वये गुन्हे नोंद करणेत आले आहेत. सदर हातभट्टी निर्मिती करणारे मुख्य सुत्रधार कोण आहेत? याबाबत कसुन चौकशी करण्यात येत आहे. सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक श्री. व्ही. एस. मासमार तसेच दु. निरीक्षक चिपळूण क्र. 1, श्री.जे.एस. खुटावळे, श्री. जी. एस. नाईक, दुय्यम निरीक्षक चिपळूण क्र.02, श्री. एम.बी.पाटील पोलिस उप निरीक्षक श्री. मनीष कांबळे, पोलिस सहा. दु. निरीक्षक, श्री. आर. बी. भालेकर, , दु. निरीक्षक, श्री. एस. एन. वड जवान ब. क्र. 18 यांनी भाग घेऊन कामगिरी बजावली. सहा.

सदर गुन्हयांचा पुढिल तपास निरीक्षक श्री. व्ही. एस. मासमार आणि दुय्यम निरीक्षक चिपळूण क्र.01 चे श्री. जे.एस. खुटावळे करीत आहेत. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई व मा. संचालक सो, (अ. व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार तसेच मा. डॉ. बी. एच. तडवी, विभागीय उपआयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापुर विभाग कोल्हापूर तसेच मा. श्री. सागर. क. धोमकर जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.