KHED: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश युवक अध्यक्ष पदी सुशांत भाई सकपाळ

Republican Party of India Konkan Pradesh Youth President Sushant Bhai Sakpal

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्याचे सुपुत्र व रिपाइंचे कोकण संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांच्या वर आता कोकण प्रदेश युवक ची जबाबदारी देण्यात आली असून या निवडी चे पत्र बुधवारी त्यांना प्रदान करण्यात आले त्यांच्या या निवडीने कोकनातून अभिनंदन केले जात आहे

रत्नागिरी जिल्हा युवा नेते सुशांतभाई सकपाळ सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखीनिय काम करत असताना सर्व सामाजिक संघटना मध्ये विवीध पदांची जबाबदारी पार पाडत आहेत
गेली अनेक वर्षे पक्षांत कॉलेज मध्ये असताना राजकीय प्रवास सुरू केला विद्यार्थी परिषद पासून कोकण प्रदेश संघटक प्रमुख तसेच बहुजन विद्यार्थी परिषद महाराष्ट्र सचिव पद सांभाळून सर्व कोकण प्रांत मध्ये रायगड जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण प्रांत मध्ये काम करत आहेत

मुंबई सारख्या शहरात विक्रोळी मध्ये आपले वास्तव्य करतात मुंबई प्रदेश युवक आघाडी सचिव २०१४ मध्ये पक्षाची युवक आघाडी स्थापन करण्यात आली त्यावेळी मुंबई आणि कोकणची जबाबदारी देण्यात आली कोकण प्रदेश संपर्क प्रमुख पक्ष संघटना मजबूत करत असताना युवक संघटन कोकणा मध्ये वाढवण्याचे काम सुरू केले विविध आंदोलन मोर्चे उपोषण मध्ये सक्रीय सहभागी होऊन अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे

रिपाइं अद्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे अतिशय जवळचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे

त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक पप्पु कागदे तसेच सरचिटणीस प्रा डॉ विजय मोरे यांनी कोकण प्रदेश युवक अध्यक्ष पदी सुशांत भाई सकपाळ यांच्या नावाची नियुक्ती जाहीर केली

या प्रसंगी डॉ. विजय मोरे सरचिटणीस युवक आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष, प्रशितोष कदम खेड तालुका युवक अध्यक्ष विकास धोत्रे, मंगेश धिवार, शहराध्यक्ष कामोठे तुषार कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते