सावंतवाडी । प्रतिनिधी :
ग्रामीण भागात रानगव्यांचा अर्थात गवारेड्यांचा वावर वाढत असून त्यांच्या कडून भातशेती व अन्य शेतीचे नुकसान होत असतानाच आता चक्क त्यांनी शहरातही धडक मारली आहे .
सावंतवाडी शहरातील सालई वाडा परिसरात दिलीप उर्फ बंड्या सारंग यांच्या घरालगत रात्री हे रानगवे पोहोचले. कुत्रे भूंकू लागल्याने सारंग यांनी पाहिले असता गव्यांचा कळप दिसून आला. नागरिकांना उद्भवणारा धोका लक्षात घेता वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Sindhudurg