सावंतवाडी । प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ तळवडेचे श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (कला), तळवडेचा १२ वीचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. ४१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.२४ टक्के एवढा लागला आहे.
शोनान परब ७५.३३ टक्के प्रथम, दत्तप्रसाद गुळेकर ७४.५० टक्के द्वितीय, विनय शेळके तृतीय ६९.८३ टक्के क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा १२ वीचा निकाल ९०.२४ टक्के