Sringari Urdu High School and Junior College 100 percent result
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शृंगारी एज्युकेशन सोसायटी संचलित शृंगारी उर्दू हायस्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज इ. १२ वी कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. या कॉलेजमधून १६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजमध्ये कुमार बोट मुजम्मिल हुसैन ७६. ३३टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कुमार तांबे हुजैफा इलियास याने ७३.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी घारे मसिरा महंमद सिददीक हिने ७२.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ०१ प्रथम श्रेणीत ०७ व व्दितीय श्रेणीत ०८ विदयार्थी उत्तीर्ण झाले.
इ. १२वी वाणिज्य शाखेचा निकाल १००.००% टक्के लागला. या कॉलेजमधून १४ विदयार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजमध्ये कुमारी रोहिले सुमय्या जहूर हिने ५८.८३टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी हमदारे जैनब महंमद कासिम हिने ५८.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी सुर्वे ज्युवेरिया खालीद हिने ५५.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. व्दितीय श्रेणीत १० विदयार्थी व तृतीय श्रेणीत ०४ विदयार्थी उत्तीर्ण झाले. या यशाबददल शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री . अब्बास इस्हाक कारबारी, उपाध्यक्ष श्री. शब्बीर अहमद बोट, सचिव श्री. रमजान साल्हे, सहसचिव श्री. जहूर अहमद बोट, खजिनदार, श्री. नुरमहंमद काझी, सहखजिनदार सौ. हसीना चोगले व इतर सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सौराज शगुफ्ता मॅडम व इतर सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विदयार्थ्याचे अभिनंदन केले.