एक दिवस छोट्यांसाठी आज रंगणार कणकवलीत खाउगल्ली कार्यक्रम

Google search engine
Google search engine

समीर नलावडे मित्रमंडळाचा उपक्रम ; आम. नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्धाटन

छोट्या बयोची मोठी स्वप्नं मधील बालकलाकार येणार कणकवलीत

कणकवली I मयुर ठाकूर : तालुक्यातील कणकवली चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे आज एक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. मुंबई येथील गायक सौरभ दफ्तरदार, तृप्ती दामले यांच्या गाण्यांच्या मैफिलचा नजराणा देखील पेश केला जाणार आहे . कॉमेडी कम अँकर विजय नायर हे देखील या निमित्ताने उपस्थित असणार आहेत. बोलक्या बाहुल्या व जादूगार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणाऱ्या सुचित्रा कुमार यांचे देखील जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे.

A day for the little ones will be organized today in Kankavli Khaugalli program

लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून असणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून सेल्फी पॉईंट देखील असणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी असेल खाऊ गल्ली कार्यक्रमातील व्यवस्था…

खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी ५० रुपयांचे कुपन दिले जाणार. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंट, झोपाळे, पाळणी, अनेक खेळ देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिक बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. यासाठी ८ × १० ची जागा देणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे.

असे असणार खाऊगल्लीतील खाद्यपदार्थ…

पिझ्झा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, यासारखे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. या ठिकाणी स्टॉलसाठी उस्फुर्त पणे जागा बुक केल्या असून, जवळपास ५० हून अधिक स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत.
गणपती साना येथील आतील भागामध्ये सेल्फी पॉईंट, मुख्य कार्यक्रम व लोकांना बैठक व्यवस्था असणार आहे. तर बाहेरील भागात मिकी माऊस व अन्य खेळाचे साहित्य असणार आहे. यासह अन्य अनेक कार्यक्रमांची मेजवानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

छोट्या बयोची मोठी स्वप्नं मधील बालकलाकार येणार….

खाउगल्ली कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील सर्व बालकलाकार याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. एक दिवस छोट्यांसाठी कार्यक्रमात या बालकलाकरांसोबत छोट्यांना मजा मस्ती करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. छोट्या बयोची मोठी गोष्ट या मालिकेतील वीणा जामकर भारती, विक्रम गायकवाड – शुभंकर, रुची नेरुरकर- बयो, अनुष्का पोकळे इरा, शौरीन देसाई- आरव, रिद्धी कदम – गुड्डी, चिन्मया ठाकूर – चैतन्या हैं बालकलाकार याप्रसंगी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.