खेड अंजुमन शिक्षण संस्थाध्यक्षपदी मुकादम

संस्थेच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड, मुकादम हायस्कूल शालेय चेअरमनपदी गौस खतीब
खेड(प्रतिनिधी)
खेड शहरातील अन्जुमन-ए-तालीम शिक्षण संस्थेच्या २०१९ मध्ये निवडून आलेल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने पाच वर्षाकरिता विश्वस्त मंडळाच्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान बिनविरोध निवड झाली, संस्थेच्या अध्यक्षपदी शमशुद्दीन अहमद मुकादम यांचीच सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
मुकादम हायस्कूल शालेय समिती चेअरमनपदी गौस खतीब, उपाध्यक्षपदी यासीन खतीब, सचिवपदी हनिफ घनसार, उपसचिवपदी जावेद कौचाली, खजिनदार मुख्तार मुकादम यांची निवड करण्यात आली. अन्जुमन- ए-तालीम उर्दू प्राथमिक शाळा शालेय समिती अंतर्गत लेखा परीक्षकपदी रियाज देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी हमीद मुकादम तर सदस्य म्हणून अहमद मुकादम, नजीर मुकादम, नालबंद मुसा,जाकीर मुसा, मुकादम हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समिती चेअरमनपदी वाहिद मुकादम तर सदस्यपदी माजिद खतीब यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्ताराम धुमक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी इब्राहिम देशमुख यांनी काम पाहिले. संस्थेचे नूतन अध्यक्ष शमशुद्दीन मुकादम व इतर पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला