Dapoli Breaking: Dr. Vice Chancellor of Balasaheb Sawant Konkan Agricultural University Dr.Ujwala Chakradev
दापोली प्रतिनिधी : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी एस.एन.डी.टी. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल आणि विद्यापिठाचे कुलपती रमेश बैस यांनी तसे आदेश दिले आहेत. 28 मे 2023 पासून, पुढील आदेशापर्यंत त्या कुलगुरूपदी राहतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.













