आचरा |अर्जुन बापर्डेकर : घरगुती गॅस सिलेंडर ची पळसंब गावात घरपोच सेवा देताना ग्राहकांकडून अतिरिक्त आकारणी केली जात असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत पळसंब सरपंच महेश वरक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडर घरपोच देताना नियमित आकारापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस रुपये अतिरिक्त आकार घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे ग्रामिण भागातील ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणेला अतिरिक्त आकारणी करु नये याबाबत सुचना देण्यासाठी पळसंब सरपंच महेश वरक यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.