ऐन निवडणुकीच्या तोंडावरच आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सेनेला जोरदार धक्का…!

सेना कार्यकर्त्यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश..!

कणकवली I मयूर ठाकूर : निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना कणकवली तालुक्यातील कलमठ येथील शिवसेना कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. ठाकरे सेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा धक्का म्हणावा लागेल.

सोनू शेख, प्रवीण मोरे, विजय खरात, बाबुल शेख यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश घेण्यात आला.

MLA Nitesh Rane gave a big blow to Thackeray Sena on the eve of general election…!

अस्लाम शहा कलमठ, एजास खान, सहेव शेख, बाबू कदम, शारूख शहा, सुनील मोरे, सुखदेव वाघमारे, पुंडलिक मसुरकर, सागर न्हावी, निखिल तांबे, विल्सन फर्नांडिस, मुश्रीफ शेख, हेदर शहा, दानिश खान, विलायत खान, सलमान खान, बाबूलाल शेख, अहमज्जाल शेख, नागेश पवार, विलास सावंत, रोहन सावंत, उमेरा शेख, आसिया शेख, परवीन शहा, रुकसार शेख, रुकसाना खान, वैदेही खरात, विजय खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला.

यावेळी आम. नितेश राणे, मा. जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री यावेळी उपस्थित होते.