MASURE: प्रांताधिकारी ऐश्वर्या कळूसे यांनी घेतले श्री भराडी देवीचे आशिर्वाद!

District Magistrate Aishwarya Kaluse took the blessings of Shri Bharadi Devi!

मसुरे | झुंजार पेडणेकर : कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.
यावेळी आंगणेवाडी येथे आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळा आंगणे यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाल्या, लोकाभिमुख सेवा या जिल्ह्यात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आज आंगणे कुटुंबीयांचे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे. तसेच नूतन मंडळ अधिकारी झालेल्या श्रीमती एम एस चव्हाण यांचाही सत्कार आंगणे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी तलाठी ए के देसाई, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर, आंगणेवाडी विकास मंडळाचे सेक्रेटरी मधुकर आंगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, चंद्रकांत आंगणे, सुरेश आंगणे, सतीश आंगणे, सुधाकर आंगणे, रघुनाथ आंगणे, संदेश आंगणे, श्री वराडकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी बाळा आंगणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.