देवरुख (प्रतिनिधी) साडवली येथील अंध संस्कृती ब्रीदने बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून 78% गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. संस्कृती हिने देवरुखातील आठल्ये सप्रे पित्रे या महाविद्यालयातून कला शाखेतून शिक्षण घेत होती. संस्कृती गायन आणि हार्मोनियम वादनात पारंगत आहे.शिक्षणासोबतच संगीताचीही आरधना करत असुन शेवटच्या विशारद परिक्षची तयारी करत आहे. संस्कृतीचे शिक्षक होण्याचे स्वप्न आहे. यासाठी ती पुढील शिक्षण घेणार आहे. संस्कृती हिने बारावी परीक्षेत जिद्दीने घवघवीत यश मिळवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. स्पेशल एज्युकेशन साठी ती प्रयत्नशील असणार आहे.
संस्कृतीच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच मदतीसाठी हात पुढे येत आहेत.
Home महाराष्ट्र रत्नागिरी साडवली येथील अंध विद्यार्थीनी संस्कृती ब्रीद कला शाखेतून महाविद्यालयात द्वितीय क्रमांक