रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजिकच्या खेडशी येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल संतोष पाले (22, रा. खेडशी, रत्नागिरी ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. सोमवारी सायंकाळी त्याने घरात कोणीही नसताना स्पीकरच्या वायरने छताच्या बाराला गळफास घेतला. सायंकाळी त्याची पत्नी आणि इतर नातेवाईक घरी आल्यावर त्यांना साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी साहिलला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गळफासाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.