अत्यंत घृणास्पद ! ताडगोळे धुतले गटारात; खेडवासीय संतप्त

खेड (प्रतिनिधी)
उष्म्याने हैराण झालेले लोक उन्हाळ्यात ताडगोळ्यांना पसंती देतात. पूर्वी समुद्र किनाऱ्याच्या भागात मिळणारे ताडगोळे काही अमराठी लोक आता कोकणात विक्रीसाठी घेऊन दाखल झाले आहेत. परंतु हे लोक ताडगोळे खेड शहरातील
गटारात धूत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य यंत्रणेकडून शीतपेय, ताडगोळे विक्रेते यांच्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातही ताडगोळे घेऊन परप्रांतीय मोठ्या संख्येने विक्रीसाठी दाखल झाले आहेत. खेडमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोरच ताडगोळे विक्रेता हा गटारातील वाहत्या पाण्यात ताडगोळे धुवून विक्रीसाठी ठेवत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित परप्रांतीय ताडगोळे विक्रेत्यांवर तातडीने आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.