खेड(प्रतिनिधी) येथील बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्या महिलेने बस मध्ये चढत असलेल्या महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्स मधून सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली
महिला या आपली मुलगी कु. श्वेता हिच्यासह दहिसर
मुंबई येथे जाण्याकरीता त्यांचे खेड येथील राहते घरातुन निघाल्या त्यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने दोन
खोक्यामध्ये व एका डबीमध्ये ठेवुन ते त्यांचे मातेरी रंगाचे पर्शचे मधील खणात ठेवुन तिची चैन लावुन त्या १०.३० वा. सुटणारे खेड बोरीवली या एस. टी. बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन
फिर्यादी हिंचे पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी महिलेने तिचे अंगावरील ओढणी फिर्यादीचे उजव्या खांद्दावर असलेल्या पर्सवर
टाकला ती ओढणी फिर्यादी यांनी दोन वेळा उडवली परंतु सदर गर्दीचा फायदा घेवुन नमुद अनोळखी महिलेने फिर्यादीच्या खांद्याला लावलेल्या पर्समध्ये मधल्या खणात ठेवलेले वरील वर्णनाचे व
किंमतीचे सोन्याचे दागीने लबाडीच्या इराद्याने, चोरून नेले