उत्कृष्ट विश्वासात्मक कामगिरी ;अन् पक्ष प्रवेशांचा धडाकाच…!

घोणसरी येथील उद्धव सेना पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश …!

आम. नितेश राणेंनी केले स्वागत…!

कणकवली I मयूर ठाकूर : ऐन निवडणुकांच्या तोंडावर कालपासून कणकवली येथे आम. नितेश राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर आम. नितेश राणे यांच्या विश्वासात्मक कामगिरीमुळे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते हे त्या – त्या पक्षांना जय महाराष्ट्र करून आम. नितेश राणे आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत.

 

Excellent convincing performance; and party entrances are a blast...!

आजही कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातील प्रमोद रावराणे (देवस्थान मानकरी), (दूध डेरी संचालिका) प्राची राणे यांचे पती, सतीश जाधव, अनिकेत खाडे, किशोर सावंत यांच्यासह अजून काही जणांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

आम. नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.