CHIPLUN: चिपळूण वैश्य समाजाच्यावतीने वैश्य नागरी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

On behalf of Chiplun Vysya Samaj felicitated the newly elected director of Vysya Civil Credit Institution

चिपळूण (प्रतिनिधी):  वैश्य नागरी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी झाला. यावेळेस पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. जीवन शांताराम गांगण तसेच व्ह व्हॉइस चेअरमनपदी सौ. विभावरी विजय गांधी यांची निवड करून दोघांनाही सन्मानपूर्वक सदर पदी विराजमान करण्यात आले. व नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळाही संपन्न झाला. यावेळेस कोअर कमिटीच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ श्री. सूचय अण्णा रेडीज, श्री.पंकजशेठ कोळवणकर,श्री. निहारजी गुढेकर, सौ. राधिका पाथरे आदि मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळेस चेअरमन श्री.जीवन शांताराम गांगण, व्हाईस चेअरमन सौ. विभा विजय गांधी, यांच्यासह संचालक श्री.हेमंत शिरगावकर, श्री.नयन साडविलकर, श्री.संदेश माजलेकर, श्री.संजय कुचेकर, श्री.प्रतिक रेडीज, श्री.तुषार रेडीज, श्री. सागर गांधी,श्री.प्रसाद साडविलकर, श्री. मनोज दळी, सौ.गीता चिंगळे, श्री.अरुण कांबळे, आदी सर्व संचालकांना तसेच पतसंस्थेचे सचिव श्री. निनाद देवळेकर यांना कोअर कमिटीतील मान्यवर अतिथीगणांसह चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर, उपाध्यक्ष श्री.प्रमोद गांगण, संस्थेचे सल्लागार श्री.अनिल चंद्रकांत उर्फ बाबुराव खातू, श्री. शैलेश जागुष्टे, सचिव श्री.अमोल टाकळे, संचालिका श्रीमती अश्विनी महाकाळ तसेच नवनिर्वाचित अर्बन बँक संचालक श्री. मिलिंदशेठ कापडी, श्री. रत्नदीप देवळेकर, माजी नगरसेवक श्री.आशिष खातू, माजी संचालक श्री. प्रवीण रेडीज, सुदेश वरवाटकर तसेच श्री. राजन कोकाटे, श्री. विजय गांधी, श्री. सचिन रेडीज, ऍड.सौ.पालवी रेडीज, सौ. रीता कोकाटे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळेस पतसंस्थेचे सर्व कर्मचारी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते..